आपला जिल्हा

जालना येथील लाठी हल्ल्याचा ‘बळीराजा संघर्ष समितीच्यावतीने निषेध

सेलू ( प्रतिनिधी ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आंदोलनाकावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ बळीराजा संघर्ष समिती सेलूच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शनिवारी निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. यादरम्यान पोलिसांनी उपोषणकर्त्यावर अमानुषपणे लाठी हल्ला करून हवेत गोळीबार केला. यात दीडशे वरून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अशोक काकडे, कॉ.रामेश्वर पौळ ,रामेश्वर गाडेकर, रमेश माने, रमेश डख, अशोक उफाडे, छगन शेरे,विजय भुजबळ, दत्तूसिंग ठाकूर, संदीप घुगे, राजकिशोर जैस्वाल, ॲड प्रभाकर गिराम, ज्ञानेश्वर उबाळे, मुंजाभाऊ डोंबे, मुंजाभाऊ काष्टे, संतोष खाडप, कल्याण पवार, उद्धवराव वाघ, शफिक अली खान, पंढरीनाथ मोरे महादेव मगर, लक्ष्मण झिंबरे, महादेव पडघन, सतीश घुमरे, गणेश काष्टे, विजय काकडे सुधाकर शेवाळे, विश्वनाथ काष्टे, भारत इंद्रोके,जगन भाबट, बाबाराव जोगदंड, बाळू शिंदे, सुनील साळेगावकर, उद्धव खोसे, शिवराम कदम, राहुल कदम, अक्षय कदम, बाळासाहेब बरसाले, श्रीराम कुलकर्णी, सुखानंद सोळंके, बबन साबळे, बळीराम मगर, संतोष घुमरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!