आपला जिल्हा
साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर मानवतरोड जवळ सशस्त्र दरोडा…..
सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून थांबवली रेल्वे

मानवत ( प्रतिनिधी ) काकीनाडा ते शिर्डी धावणाऱ्या (क्रमांक 17206) साईनगर शिर्डी एक्सप्रेसला मानवतरोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून थांबवण्यात आले आणि 8 ते 10 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची गंभीर घटना गुरुवारी (दि.16) पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.




