आपला जिल्हा

उपविभागीय दंडाधिकारी सेलू यांची मध्यरात्री नदीपात्रात उतरून कार्यवाही

शैलेश लाहोटी यांची गौण खनिज माफियावर करडी नजर

सेलू ( प्रतिनिधी )उपविभागीय दंडाधिकारी सेलू शैलेश लाहोटी यांनी शुक्रवार दि.23 जानेवारी रोजी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील नदीपात्रात जाऊन अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यावर धडक कार्यवाही केली आहे.

सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे मध्य रात्री अंदाजे 11.30 वाजता प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन अवैध गौणखनिज वाहतूक करणारे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली जप्त करून तहसील कार्यालय सेलू येथे लावण्यात आली आहे.
सदर वाहन मालकाचे नाव पुरुषोत्तम टाके रा.चिकलठाणा बु ता.सेलू असून ट्रॅक्टर नंबर MH.38 v.0166 असा आहे
या कार्यवाही वेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या सोबत मंडळ अधिकारी श्री. आमदारे तलाठी श्री. खंडागळे कोतवाल सतीश कटारे हे हजर होते.
सेलू तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांच्या सततच्या कारवाई मुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!