आपला जिल्हा

पालकांनो, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यशाळेत सहभागी व्हा!

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू, दि. 12 जून  प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू यांच्या वतीने पालकांसाठी एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 13 जून 2025 रोजी साई नाट्य मंदिर, सेलू येथे सायंकाळी 5:00 वाजता होणार आहे. या कार्यशाळेत ऑनलाइन आणि ऑफलाइन सत्रांद्वारे पालकांना मुलांच्या शिक्षण आणि पालकत्वाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

ऑनलाइन सत्रात फिनलंड येथील प्रसिद्ध पालकत्व प्रशिक्षक स्टेल्ला मॅडम आणि मिला मॅडम आपले अनुभव आणि तज्ञांचे मार्गदर्शन पालकांशी शेअर करतील. त्यांच्या अनोख्या शिक्षण पद्धती आणि पालकत्वाच्या टिप्समुळे पालकांना मुलांचे संगोपन आणि शिक्षण याबाबत नवीन दृष्टिकोन मिळेल.
ऑफलाइन सत्रात प्रसिद्ध युट्यूबर आणि पालक प्रशिक्षक सौ. संज्योत वैद्य, शिक्षणतज्ञ महेश पाटील, तसेच मेधा बागुल, लीना चिलवंत आणि प्रिया ठाकूर या विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. हे तज्ञ पालकांना मुलांचे शिक्षण, मानसिक विकास आणि करिअर मार्गदर्शन याबाबत मौलिक माहिती देणार आहेत.
या कार्यशाळेचे आयोजन डॉ. संजय रोडगे, अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांनी केले आहे. पालकांना आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी नवीन संकल्पना आणि दृष्टिकोन देण्याचा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
पालकांनो, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!