सेलू ( किशोर कटारे ) सेलू तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सभापती तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तसेच माजी आमदार विजय भांबळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अशोक नाना काकडे यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडवणीस तथा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त न्यूज महाराष्ट्र 36 च्या हाती लागले आहे.
सेलू तालुक्यातील जवळपास 25 गावचे सरपंच सेलू येथील मार्केट कमिटी येथील काही संचालक यांच्यासह सेलू तालुक्यातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.