आपला जिल्हा

सय्यद हुसैन, समाज कल्याण निरीक्षक यांचा गुलमोहोर कॉलनी च्या वतीने सत्कार……

सेलू :- ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद परभणीच्या तीन रत्नांना ” राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024″ ने सन्मान समाज कल्याण विभागातील श्री वशिष्ठ मस्के, , श्री हुसेन . ए. सय्यद, समाज कल्याण निरीक्षक, व वित्त विभाग येथील, श्री .धम्मदीप भराडे, कनिष्ठ लेखा अधिकारी वित्त विभाग या तीन रत्नांना नुकतेच सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा या मिनी संसद म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या विकासाबरोबरच अनेक कल्याणकारी योजना या जिल्हा परिषदा मार्फत राबविला जातात. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा परिषदेतील कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे, संविधानाप्रती जनजागृती करणारे, जिल्हा परिषदेमार्फत रविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करणारे तसेच आपल्या शासकीय नोकरीत जबाबदारीने सेवा देणारे तसेच समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय कार्यात सक्रिय सहभाग घेणारे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संविधान दिनाच्या औचित्य साधून रुग्णहक्क संरक्षण समिती आयोजित येथिल पत्रकार भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता . या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणी च्या वतीने हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी येथे देण्यात आला
जिल्ह्यासोबतच जिल्हा परिषदेची ही मान उंचावण्याचं काम केले आहे. या मुळे गुलमोहर कॉलनी सेलू येथील नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्य करणारे श्री सयद हुसेन यांचा सत्कार कार्यक्रम दिनांक 02/12/24 रोजी त्याच्या निवास्थानी जाऊन हार शाल वपेढे देऊन करण्यात आला या प्रसंगी श्री जमाखान, रशीद सहाब इंजिनिअर, निसार पठाण, मौजम सर, हकीम कादरी, सिद्दीक भाई बागवान हाफीज उल्ला खान पठाण आदी उपस्थित मध्ये कार्यक्रम करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!