सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील सुरेश श्रीकिशन करवा यांच्या खून प्रकरणाचा निकाल शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी प्रथम न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय परभणी श्रीमती एस.एस. नायर यांनी दिला असून या निकालात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अॅड, ज्ञानोबा दराडे यांनी काम पाहिले. सुरुवातीला अपघाती मृत्यू तेथून समाजमाध्यमावर व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप, पुढे आलेले अनैतीक संबंध आणि सुरेश करवा यांच्या झालेल्या खूनाची उकल असा क्रम या घटनेत होता.
सेलू येथील सुरेश श्रीकिशन करवा यांचा २ मे २०२१ रोजी अपघात झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात तपास करत असतानाच मयत इसमाची पत्नी आणि राहुल भिकुलाल कासट या दोघांमधील फोनवर झालेले संभाषण समाजमाध्यमावर व्हायरल झाले. यामध्ये सुरेश करवा यांच्या मृत्यू होते. या व्हायरल क्लिप बाबत मयताचे भाऊ सुनावण्यात आली. सरकार सतिश करवा यांना समजल्यावर पक्षातर्फे अॅड. ज्ञानोबा दराडे.
सलग १३८ दिवस चालली सुनावणी
सेलू येथील सुरेश करवा यांच्या खूनाचा खटला परभणी येथील न्यायालयात चलला. न्यायालयामध्ये सलग १३८ दिवस खटला चालविण्यात आला. चौदा महिन्यात या खटल्याचा निकाल लागला असून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. खटल्यात न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी साक्षीपुरावा नोंदविला.
न्यायालयातून
त्यांनी मयताच्या पत्नीची विचारपुस केली असता राहुल कासट यांच्या सोबत असलेले संबंध पुढे आले. त्यानंतर सतिश करवा यांना भावाच्या अपघाती मृत्यू विषयी संशय आला. हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे पुढे आले. पोलिसांनाही घातपाताची कुनकुन लागली. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त, सपोनि. कपिल शेळके, गजानन राठोड, सतिश धबडगे, गणेश कौटकर यांच्या पथकाने तपास् करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ५१ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात एकही साक्षीदार फितुर झाला नाही. प्रथम न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांनी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी या खटल्यात निकाल देत आरोपी राहुल कासट, विनोद अंभुरे, विशाल पाटोळे, राजेभाऊ खंडागळे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी राहुल कासट याला १ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड कारावास तर इतर तीन आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा
सेलू येथे झालेल्या या घटनेची राज्यभरात चर्चा झाली. कारण सदर घटनेमध्ये आरोपी राहुल कासट याच्या विरुध्द कारवाई न करण्याबाबत लाचेच्या मागणीचे प्रकरणही पुढे आले. यामध्ये तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल व इतर कर्मचाऱ्यांवर सापळ्याची कारवाई झाली होती.
यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. आनंद गिराम, अॅड. सय्यद रहेमत हबीब, अॅड. महेंद्र कदम, अॅड. मयुर साळापुरीकर, अॅड. अभिलाषा पाचपोर, अॅड. नितीन खळीकर, अॅड. बाळासाहेब घटे, अॅड. सुहास कुलकर्णी, अॅड. सुनंदा चावरे, अॅड. देवयानी सरदेशपांडे, वरिष्ठ अधिवक्ता माधवराव भोसले यांनी मदत केले. कोर्टपैरवी अधिकारी म्हणुन सपोनि. संतोष सानप, पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलिस अंमलदार वंदना आदोडे, प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.