आपला जिल्हा
सेलूत श्रीरामकथा कार्यालयाचे उद्घाटन
सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर (हनुमानगढ) आयोजित राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून दिनांक १५ ते २३ आक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामकथा कार्यालयाचे उद्घाटन, दिनांक ३ आक्टोबररोजी आयोजक जयप्रकाश बिहाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंद जोशी, डॉ राम रोडगे, मदलाल करवा, दत्तराव पावडे, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, विजयकुमार बिहाणी, अतुल दातार,व्यंकटेश काबरा,अविनाश बिहाणी, आदींची उपस्थिती होती.
रामकथा कार्यालय उदघाटन व्हिडीओ पहा