आपला जिल्हा

समूहगीत गायन स्पर्धेत नूतन विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

⬛ विवेकानंद कला महाविद्यालयातर्फे आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत नूतन विद्यालयाचे यश.

सेलू ( प्रतिनिधी ) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विवेकानंद कला व सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संभाजीनगर तर्फे आयोजित समूहगीत गायन स्पर्धेत नूतन विद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.

या स्पर्धेत एकूण 37 संघांनी भाग घेतला होता, त्यात नूतन विद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे, यात वैष्णवी पिंपळगावकर, मानसी दलाल, समृद्धी राखे, आर्या घांडगे, दर्शना जोशी, स्नेहल जोगदंड, श्रुती कुलकर्णी, वैष्णवी बोठे, ऋतुजा महाजन, अथर्व तोडकर, प्रज्योत पांचाळ, आनंद राऊत व विठ्ठल बोरसे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांचे मार्गदर्शन लाभले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहानी, कार्यकारिणी सदस्य डॉ शरद कुलकर्णी, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ काशिनाथ पल्लेवार, सुनीता सांगुळे व सेलुतील विविध संगीत परिवार आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!