आपला जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जनसेवा नागरी पतसंस्थेच्या वतीने क्रीडा शिक्षकांचा गौरव

सेलू ( प्रतिनिधी ) 
येथील जनसेवा नागरी पतसंस्थेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुरूवार ता. २९ ऑगस्ट रोजी हॉकी चे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त तालूक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला.


या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीरराव चौधरी, सचिव श्री गणपतराव लहुरीकर, उपाध्यक्ष प्रा.गौतम सुर्यवंशी, संचालक श्री प्रा.नागेश कान्हेकर, मोहन खापरखुंटीकर,नरेंद्र धानोरकर, शाखाधिकारी श्रीपाद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेष्ठ क्रीडा शिक्षक देविदास सोन्नेकर, सतीश नावाडे, प्रदीप कौसडीकर,प्रा.डॉ.के.के.कदम, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, सौ संगीता खराबे,गणेश माळवे, किशोर ढोके, सुभाष मोहकरे, अनिल कौसडीकर,रामेश्वर कदम,शेषराव नागरे,राजेश राठोड ,रामा गायकवाड, सुरज शिंदे, प्रा.सौ.सुश्मीता भरदम यांचा मान्यवरांच्या हस्ते व्हीसल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा नागेश कान्हेकर, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर, गणेश माळवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी ते साठी पतसंस्थेचे कर्मचारी गंगाधर वाघमारे, प्राची डासाळकर, विजय होलीया यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!