आपला जिल्हा
साईबाबा नागरी सहकारी बँकेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
2023-24या आर्थिक वर्षात बँकेला 1 कोटी,89 लाख 96हजार निव्वळ नफा

सेलू (प्रतिनिधी ) साईबाबा नागरी सहकारी बँकेची29वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 13जुलै 2024 रोजी स्वामी रामानदं तीर्थ हिंदी मराठी ग्रथालंय येथे सकाळी 11वाजता संपन्न झाली. या सभेस सभासद उपस्थित होते. सभेची सुरूवात साईबाबा च्या मूर्ती पूजनाने झाली सभेचे अध्यक्ष तथा बँकेचे सस्थापक अध्यक्ष श्री हेमंत आडळकर होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर,माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर, संचालक श्री जयप्रकाश बिहाणी,डिव्ही मुळे मधुकर नाना पौळ, यांची उपस्थिती होती.




