सेलू (प्रतिनिधी) येथील रहिवासी डॉ. पुरूषोत्तम गिरी यांची भारतीय रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र (IAPSM) संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी (President) निवड झाली आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च (IIMSR) वैद्यकीय महाविद्यालयात कम्युनिटी मेडिसिन विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. पुरूषोत्तम गिरी यांची आय.ए.पी.एस.एम (IAPSM) च्या नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरील निवडणूकीत त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आय.आय एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालय बदनापूर चे अधिष्ठाता डॉ. अझहर सिद्दिकी, आय.एम.ए. सेलूचे अध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सेलू डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. ऋतुराज साङेगावकर, उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर, डॉ. एस. एम. लोया, माजी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. संजय रोडगे, डॉ. सुबोध माकोडे, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. रामेश्वर साबळे, डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. विलास मोरे, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलींद सावंत, डॉ. अरविंद बोराडे, डॉ. शेषनारायण केवारे, डॉ. प्रताप घांडगे, डॉ. प्रजीत रावते, डॉ. आशिष डख, डॉ. टी. एस. चट्टे, हरिश चेचेडिया, सुभाष मोहकरे यांच्या सह डॉक्टर असोसिएशन व वैद्यकीय क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे. महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातील आय.ए.पी.एस.एम. (IAPSM) संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी डॉ. पुरूषोत्तम गिरी यांच्या रूपाने मराठवाड्याला प्राप्त झाली आहे व सदरील निवड हि सन एप्रिल 2024 – मार्च 2027 या तीन वर्ष कालावधी साठी आहे.