आपला जिल्हा

भगवान बाबा पुण्यतिथीच्या अखंड हरिनाम सप्ताहाची ऊत्साहात सांगता..

सेलू,दि.२८ (प्रतिनिधी): वालूर (ता.सेलू) येथेराष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी (दि.२७) ऊत्साहात सांगता.या वेळी माणिक महाराज रेंगे यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला.

सप्ताह दरम्यान श्रीमद् भागवत कथा,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच
नारायण बुवा पाठक यांनी भागवत कथा वाचन केले.सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महेश महाराज देशमुख, प्रकाश महाराज फड, विजय महाराज वाघ बनकर,शिवतेजानंद महाराज दराडे,राधेश्याम महाराज खरबळ,विठ्ठल महाराज उमरीकर, जालिंदर महाराज दराडे यांचे रात्री ९ ते ११ या वेळेत किर्तनाचा भारूड ,जागरणाचा लाभ भाविकांनी घेतला. पहाटे ४ते ६ काकडा भजन, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२ ते ३ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा,सायंकाळी ६ते ७ हरिपाठ,सकाळी काकडा,हरीजागर झाला.
शनिवारी (दि.२७) सकाळी ११ते १ माणिक महाराज रेंगे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले.
पंचक्रोशीतील भाविकांनी भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!