परभणी ( प्रतिनिधी ) आज दि. १२ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कामासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलीस अधिकारी यांच्यासाठी पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी मा. श्री. रघुनाथ गावडे, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, परभणी, मा.श्री. प्रताप काळे, अपर जिल्हाधिकारी परभणी, श्री. निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. श्री. दत्तु शेवाळे, उपविभागीय अधिकारी, परभणी, श्री. शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी पाथरी, श्री. जीवराज डापकर उपविभागीय अधिकारी, गंगाखेड, श्री. दिनेश झांपले, तहसीलदार सेलु, श्री. राजेश सरवदे तहसीलदार जिंतुर हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. सकाळ सत्रामध्ये ९६-परभणी व ९८-पाथरी विधानसभा मतदार संघातील अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर दुपार सत्रात ९५. जिंतूर विधानसभा मतदार संघ व ९७-गंगाखेड विधानसभा मतदार संघातील क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलीस अधिका- यांना प्रशिक्षण देण्यात आले. १७- परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक कामासाठी जिल्हाभरात एकूण १९८ क्षेत्रिय अधिका-यांची व त्यासोबत १७० पोलीस क्षेत्रिय अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये १७० प्रत्यक्ष कामासाठी नेमण्यात आलेले असून २८ राखीव म्हणून नेमण्यात आलेले आहेत.
नेमण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिका-यांपैकी ९५-जिंतूर विधानसभा मतदार संघासाठी ४९ व राखीव ०६ असे एकूण ४७ क्षेत्रिय अधिकारी, ९६-परभणी विधानसभा मतदार संघासाठी ३८ व राखीव ०८ असे एकूण ४६ क्षेत्रिय अधिकारी, ९७- गंगाखेड विधानसभा मतदार संघासाठी ४५ व राखीव ०६ असे एकूण ५१ क्षेत्रिय अधिकारी तर ९८-पाथरी विधानसभा मतदार संघासाठी ४५ व राखीव ०६ असे एकूण ५१ क्षेत्रिय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. एकूण नेमलेल्या १९८ अधिका-यांपैकी १८२ अधिका-यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रशिक्षण घेतलेले आहे. या प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या एकूण १६ अधिका-यांना निवडणूक विभागातर्फे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अन्वये कारणे दाखवा नोटीस देऊन कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये निवडणुक पूर्व काळात क्षेत्रीय अधिकारी यांनी करावयाच्या पूर्वनियोजनात Vulnerable Mapping and Critical Polling Station संदर्भात कार्यवाही करून प्रत्यक्ष भेटी देवून 8 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सर्व मतदान केंद्रांची तपासणी करुन AMF सुविधा आहेत किंवा कसे ? याबद्दल प्रत्यक्ष भेटी देवून अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. Do’s and Don’ts बद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागातील सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणाचा समारोप श्री. दत्ता गिणगिणे अ.का. निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता केली.