सेलू ( प्रतिनिधी ) अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू च्या वतीने दिनांक 24/01/2026 शनिवार रोजी उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम माशाल्लाह हॉल मध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमास शेख जमील अहेमद(एम. एस. सी. बि. एड. ईकरा हाईस्कूल छत्रपती संभाजीनगर जेष्ठ शिक्षक व शासनमान्य मार्गदर्शक ), शेख अजिमोदिन (एम. ए. एम. एड. पि. एच. डी. प्राध्यापक शासकीय अध्यापक महाविद्यालय, सेवानिवृत्त प्राचार्य अध्यापक महाविद्यालय लखनौ विध्यापीठ ), ईलियास अहेमद, रशिद मामून, यासेर शाळेचे संस्थापक पठाण रहिम खान अदि उपस्थित होते.
अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू च्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद हारून बागवान होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रस्तावणा जकी अहेमद सिद्दीकी यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शमशोदिन शेख यांनी तर शेख मौजम सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी सह महिला पालकांनी भरघोस उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलूचे अध्यक्ष इंजिनिअर अनिस कुरैशी, सचिव हाजी पठाण शफीक खान, कोषाध्यक्ष पठाण निसार, उपाध्यक्ष शेख महेमुद, सदस्य इंजिनिअर पठाण रशिदखान,घोरी जावेद उद्योजक इम्रान कुरैशी, इमाम सर, हाजी रफीक सर,असगर सहाब यांनी परिश्रम घेतले.