आपला जिल्हा

नूतन विद्यालयाच्या गुणवंतांचा बुधवारी सत्कार

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त, विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा बुधवारी, २७ सप्टेंबररोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

शाळेच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे (सह्याद्री हॉस्पिटल, पुणे) उपस्थित राहात आहेत. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. याप्रसंगी उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्था गुणवत्ता सन्मान पारितोषिके, पालक शिक्षक संघ व परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या पारितोषिकांनी गुणवंतांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!