सेलू ( प्रतिनिधी ) मंगळवार दि.22 ऑगस्ट रोजी मौजे डासाळा येथे विठ्ठल मंदिराचे बाजूस रोडवर दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर
आरोपींतानी संगणमत करून दोन मोटरसायकलच्या साह्याने सातोना येथून विनापरवाना बेकायदेशीर रित्या प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल देशी दारू भिंगरी संत्रा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे ताब्यात बाळगत असताना मिळून आल्याने सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गौतम संजय साळवे वय 24 वर्ष, 2. राहुल भाग्यवंत, 3. करण साळवे, 4. गोरख भाले, 5. सचिन पारवे 6. बालकिशन साळवे सर्व राहणार देऊळगाव गात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वरील आरोपी कडून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात 13,440.00 रुपयाच्या एक पांढऱ्या रंगाचे पिशवीत देशी दारू भिंगरी संत्रा नावाचे लेबल असलेल्या 180 एम एल च्या काचेच्या सीलबंद चार बॉक्समध्ये एकूण 192 काचेच्या सीलबंद बॉटल प्रत्येकी किंमती 70 रुपये दराप्रमाणे असे एकूण 2) 25,000.00 रुपये एक काळया व लाल रंगाची होंडा कंपनीची एस पी 125 सीसी ची विना नंबरची मोटर सायकल इंजिन क्रमांक jc83eg-3457406 नंबर व चेसिस नंबर me4jc83d mn C238727 क्रमांक असलेली जुनी वापरते किंमत अंदाजे 3) 10080.00 रुपये एक पांढऱ्या रंगाचे पिशवीत देशी दारू भिंगरी संत्रा नावाचे लेबर असलेल्या 180 एम एल च्या काचेच्या सीलबंद तीन बॉक्स मध्ये एकूण 144 काचेच्या सीलबंद बॉटल प्रत्येकी किंमती 70 रुपये दराप्रमाणे 4) 25,000.00 एक काळया व पिवळ्या रंगाची होंडा कंपनीची एस पी शाईन 125 सीसी ची विना नंबरची मोटर सायकल जिचा इंजिन jc73-e-t 2074313 व चेसिस नंबर me 4jc737ejt040134 असा क्रमांक असलेली जुनी वापरते किंमत अंदाजे 5) 00.00 दोन खताच्या पांढऱ्या पिशव्या जुनी वापरते असा एकूण = 73520 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमंलदार* पो ह भिसे हे करीत आहेत.