आपला जिल्हा
परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८.५ मि.मी. पाऊस

परभणी, दि.१९(प्रतिनिधी ): जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८.५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक परभणी आणि पुर्णा तालुक्यात १२.१ मि.मी. पाऊस पडला आहे. तर सेलू ९.७ आणि पाथरी ८.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पालम ८.३, जिंतूर ७, गंगाखेड ५.२, सोनपेठ ४.६ आणि सर्वात कमी मानवत तालुक्यात ४.५ मि.मी. पाऊस पडला आहे.