महाराष्ट्र

विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन

 बारामती – विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्सिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे.

 कसा झाला अपघात ? 

अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. यानंतर काही सेकंदातच विमानाने पेट घेतला.

संपूर्ण विमान या अपघातात जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरली होते. या घटनेची माहिती मिळातच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्यासह विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!