आपला जिल्हा

न्यूज महाराष्ट्र 36 च्या बातमीने मतदारासाठी रोड दुरुस्ती सुरु

पाथरी रोड ते फुलेनगर या ठिकाणचा मतदारांना मतदान करण्यासाठी अडथळा झाला दूर

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभा मतदारसंघातील जिंतूर विधानसभा मतदान क्षेत्रातील सेलू भागातील मतदान केंद्र क्रमांक 56 व 57 या ठिकाणी सदरील रोडचे काम होत असल्याने पाथरी रोड ते फुलेनगर या ठिकाणी गुत्तेदाराने मोठ मोठे दगड टाकून ठेवल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. या बातमीची न्यूज महाराष्ट्र 36 च्या बातमीची दखल घेत मतदान करताना मतदारासाठी कोणताही त्रास होणार नाही या साठी मोठं मोठया दगडावर मुरूम टाकून दबाई करणे सुरु आहे.

त्यामुळे सदरील परिसरातील नागरिकांनी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
या मतदान केंद्रावर फुलेनगर येथील सोळाशे मतदान, कृष्णानगर येथील साडेबाराशे मतदान तर भीम नगर येथील 650 मतदान असल्याचे समजले आहे. या दोन ठिकाणच्या बुथवर जवळपास साडेतीन हजार मतदान असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीत मतदानाच्या दिवशीच नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्यात मोठमोठे दगड टाकल्याने मतदान कसे करावे असा यक्षप्रश्न मतदारासमोर पडला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!