आपला जिल्हा

रासायनिक खतांच्या किंमती तातडीने कमी करा — दबाव गटाची मागणी

सेलू (प्रतिनिधी)  दि 06 सध्या सगळीकडे खतांच्या किमती वाढत असल्याचे विविध प्रसारमध्यमांवर दिसत आहे.यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतांना रासायनिक खतांची भाववाढ ही शेतकऱ्यांना धसका देणारी आहे.त्यामुळे तातडीने ही भाववाढ रद्द करण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने आज दि 06 मे रोजी कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आधीच अपूरा पाऊस तर कधी अवकाळी पाऊस याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे. त्यात पुन्हा शेत मालाला भाव नाही. चोहोबाजूने शेतकरी पिळून काढला जात आहे.

त्यात आता पुन्हा रासायनिक खतांच्या किंमतीत विनाकारण भरमसाठ वाढ करण्यात आल्याच्या बातम्या सातत्याने चालू आहेत. त्यात दिसणारी भाववाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे. शासनास व खत, औषधी कंपन्यांना शेती व्यवसाय बंद करायचा की काय?अशी अवस्था निर्माण झाली आहे तसेच खरीप हंगामापूर्वी ही केलेली भाववाढ तात्काळ रद्द करण्यात यावी त्याच प्रमाणे पूर्विच्याच दरात खरीप हंगामात पुरेसा व दर्जेदार खत, औषधी पुरवठा करण्याबाबत सक्त सूचना कृषी विभाग जिल्हा परिषद् यांना देण्यात यावी.बोगस अप्रमाणित खते, बियाणे व औषधी पुरवठा करण्याऱ्या कंपन्या व विक्री करणारे व्यापारी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अँड श्रीकांत वाईकर अँड. टी.ए. चव्हाण, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, आबासाहेब भुजबळ,गुलाबराव पौळ, रामचंद्र कांबळे, दत्ता कांगणे,सतीश काकडे,लक्ष्मण प्रधान, भारत रवंदळे, लिंबाजी कलाल, जलाल भाई, चिंतामण दौंड, रामचंद्र आघाव, दिलीप मगर, महादेव लोंढे, मुकुंद टेकाळे, उध्दव सोळंके, नारायण पवार,अजित मंडलीक, राजेंद्र केवारे, दिलीप शेवाळे,रौफ भाई, शेख मतिन दादामिया, चंद्रकांत चौधरी, अँड. उमेश काष्टे, अॅड. योगेश सूर्यवंशी, ऍड पांडुरंग आवटी, परमेश्वर कादे, प्रमोद वीर, डॉ. गणेश थोरे, अॅड. देवराव दळवे, उत्तम गवारे, गणेश सोळंके, विलास रोडगे, दत्ता गायके, गणपत मिटकरी आदींची नावे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!