आपला जिल्हा

१ जून नंतरच कापूस लागवड करा … बोंड अळीला नियंत्रीत करा….

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रामध्ये खरीप २०१७ च्या हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन खरीप २०१८ ते २०२३ मध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला आहे. येणाऱ्या खरीप २०२४ च्या हंगामामध्ये ही शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपुर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता खरीप २०२४ मध्ये शेंदरी बोंड अळीच्या प्रार्दुभावास आळा घालण्याकरीता शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत होण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन प्रत्यक्ष लावगड ही १ जून २०२४ नंतरच होईल हे कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रीत करणे शक्य होईल. याकरीता क्षेत्रीयस्तरावर कटाक्षाने पालन करणे बाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करुन अंमलबजावणी करावी व विभागीय कृषि सहसंचालक यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे.

कापूस बियाणे पुरवठा करणेबाबत निर्देशित दिनांक पुढीलप्रमाणे

१. उत्पादक कंपनी ते वितरक ०१ मे २०२४ ते १० मे २०२४.

२. वितरक ते किरकोळ विक्रेता १० मे २०२४ नंतर

३. किरकोळ विक्रेता ते शेतकरी १५ मे २०२४ नंतर

४. शेतक-यांना प्रत्यक्ष लागवड १ जून नंतर

उपरोक्त निर्देशित केलेनुसार सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनी/वितरक/किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियम 2009 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!