आपला जिल्हा

पाथरी रोड ते फुलेनगर या ठिकाणी मोठ मोठे दगड टाकून ठेवल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी अडथळा

⬛सेलू परिसरातील जवळपास साडेतीन हजार मतदाराना होणार त्रास

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभा मतदारसंघातील जिंतूर विधानसभा मतदान क्षेत्रातील सेलू भागातील मतदान केंद्र क्रमांक 56 व 57 या ठिकाणी सदरील रोडचे काम होत असल्याने पाथरी रोड ते फुलेनगर या ठिकाणी रोडच्या कामासाठी मोठ मोठे दगड टाकून ठेवल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे सदरील परिसरातील नागरिकांनी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या मतदान केंद्रावर फुलेनगर येथील सोळाशे मतदान, कृष्णानगर येथील साडेबाराशे मतदान तर भीम नगर येथील 650 मतदान असल्याचे समजले आहे. या दोन ठिकाणच्या बुथवर जवळपास साडेतीन हजार मतदान असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणुकीत मतदानाच्या दिवशीच नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्यात मोठमोठे दगड टाकल्याने मतदान कसे करावे असा यक्षप्रश्न मतदारासमोर पडला आहे तरी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी येथील मतदाराच्या मतदानासाठी योग्य ते पावले उचलून सुलभ मतदान कसे करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी परिसरातील मतदाराकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!