आपला जिल्हा

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता जाणकारांना साथ द्या- आ. मेघना बोर्डीकर-साकोरे

श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार संकुल येथे सेलू तालुक्यातील बैठक संपन्न

सेलू (ता 25) रोजी श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार संकुल येथे सेलू तालुक्यातील बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेलू- जिंतूर मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मा आ. मेघना बोर्डीकर- साकोरे मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, डॉ. संजय रोडगे, श्री माऊली ताठे, श्री. अजय डासाळकर श्री. सारंगधर महाराज रोडगे, श्री. प्रसाद खारकर, श्री. रवि डासाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना परभणी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय व त्यानुसार प्रयत्नांची पराकाष्टा करून विकास करण्याचे उद्दिष्ट मनाशी बाळगून महायुतीचे पुरस्कृत उमेदवार महादेवजी जानकर यांना विकासाची नांदी आणण्यासाठी आपल्या सहकार्याची तसेच मतदानातून आशीर्वादाची अपेक्षा आहे. खरंच आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचे धाडस हे महायुती सरकारमध्येच आहे. या येणाऱ्या काळामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता महायुतीला साथ द्या. श्री. महादेव जानकर यांना लोकसभेमध्ये परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी सर्वाधिक मतांनी विजयी करा.

मा. रामप्रसादजी बोर्डीकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केल. तसे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब हे काम करत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महादेव जानकर यांना निवडून द्या. मराठा समाजाला महाविकास आघाडी सरकारने दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कट रचून कोर्टातील मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील ४० हजार पान गायब करून राम मंदिरला विरोध करणारे वकील उभे करून महाविकास आघाडीच्या दळभद्री सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालवले असून आता पुन्हा नव्याने महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असून हे आरक्षण कोर्टात टिकविण्याची जबाबदारी महायुती सरकारची असून कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या अडचणी सोडवून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेले आरक्षण कोर्टामध्ये टिकविण्यात येईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!