आपला जिल्हा

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशाची वाटचाल महासत्तेकडे – डॉ. संजय रोडगे

सेलू (प्रतिनिधी ) रोजी श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार संकुल येथे सेलू तालुक्यातील बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेलू- जिंतूर मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मा आ. मेघना बोर्डीकर- साकोरे मा. आ. रामप्रसादजी बोर्डीकर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, डॉ. संजय रोडगे,श्री. माऊली ताठे, श्री. अजय डासाळकर श्री. सारंगधर महाराज रोडगे, श्री. प्रसाद खारकर, श्री. रवि डासाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करून नवनवीन उद्योगधंदे आणून आवश्यक त्या भागात एमआयडीसी उभारणार. जाती धर्मात भेदभाव न करण्याची छत्रपतींची प्रेरणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं वाटचाल करत आहेत.
महाविकास आघाडी कडे कोणताही विकासासाठी अजेंडा नाही विकास करण्याची कुठलीही मानसिकता नाही अशा विकृत आणि दिशाहीन असणाऱ्या महाविकास आघाडीला हद्दपार करण्याची वेळ आली असून प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथपर्यंत सक्रियपणे सहभाग नोंदवत हि निवडणूक आपण स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने लढण्याची गरज आहे. माझ्या बुथवर कशी सर्वाधिक मताधिक्य देता येईल यासाठी प्रयत्नशील असावे. सर्व लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांनी आपापल्या बुथची जबाबदारी घेत सर्वाधिक मतदान महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. महादेवजी जानकर यांच्या “शिट्टी” या निवडणूक निशाणीला सर्वाधिक मते मिळवून देऊन विजयी करावे असे यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!