आपला जिल्हा

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने घटनात्मक दर्जा देऊन जीवन सर्वांर्थाने सार्थक केले…. श्रीपाद कुलकर्णी.

सेलू ( प्रतिनिधी )
समाजाच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना अथवा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी घटनात्मक दर्जा मिळवून देणारे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ.बाबासाहेब हे विद्यार्थी दशेत असताना समाजातील सर्वसामान्य दीन दुर्बल घटकांसाठी आपलं सामाजिक उत्तरदायित्व जपलं. ग्रंथावर प्रेम करणाऱ्या या महामानवाचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे.अठरा अठरा तास वाचन करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजातील आदर्श पुरुष म्हणून ओळखले जात. तसेच समता बंधुता आणि एकात्मतेचा पुरस्कार करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षित व्हावी यासाठी आपल्या घरातुन सुरुवात केली. दुर्बल घटकांसाठी आपलं सामाजिक उत्तरदायित्व जपणारं महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपलं आयुष्य वेचलं. असं स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्रीपाद कुलकर्णी म्हणाले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हे समाजातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.ज्ञान हे कोणा एकाची मक्तेदारी नाही तर ते सर्वांना अवगत करून देण्यासाठी सार्वजनिक वाचनालय इमानेइतबारे कर्तव्य पार पाडत आहेत हे आजच्या कार्यक्रमातुन लक्षात येते. केवळ अभिवादन करून न थांबता आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मार्गदर्शन केले पाहिजे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा अंगिकार केला जावा असं मला या ठिकाणी नमूद करावसं वाटतं. असं प्रतिपादन पुजा नानासाहेब घाडंगे पाटील ( सातारा ) यांनी केले.
याप्रसंगी प्रा.अनंत मोगल, दिलीप डासाळकर, महावीर सरक यांनी आपली मनोगत व्यक्त केली .
डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित जगाडे तर सूत्रसंचालन ग्रंथपाल महादेव आगजाळ यांनी आणि आभार ग्रंथालयाचे सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास शिंदे, अनिरुद्ध टाके यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित नागरिक म्हणून संजय विटेकर, गंगाधर गुंजंकर, कल्याण पवार, हेमंत भिसे (बारामती ) सीमा बनसोडे ( सातारा )सुयोग साळवे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!