आपला जिल्हा

‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील 17 व्यक्तित्वांचा गौरव

गेल्या तीन वर्षापासून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सेलू येथील कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने मागील तीन वर्षा पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचासाठी ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा आयोजित केला जातो.

यंदाचा सोहळा शनिवारी, १३ एप्रिल साईनाट्य मंदिर येथे उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, हेमंतराव आडळ कर, रामप्रसाद घोडके, संयोजक अशोक काकडे, जयप्रकाश बिहाणी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्कारप्राप्त साईबाबा नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळ कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १७ जणांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. विजेंद्र नागोरी (वैद्यकिय), रमेश माने (रोपवाटीका), सर्जेराव लहाने (सहकार), मोहन बोराडे (पत्रकारिता), नथुराम अंभोरे (सामाजिक), पूजा तोडकर (संगीत), वसंतराव डासाळ कर (शिक्षण), अॅड. सुनिता ढोले (विधी), डी.डी. सोन्नेकर (क्रीडा), सुप्रिया सोन्नेकर (नाट्य), प्रा. संजय पिंपळ गांवकर (अध्यात्मिक), राजेश धापसे, शफीक अली खान (सामाजिक) कलीमभाई बेलदार (कामगार), सोमेश्वर गिराम (कृषी), नारायण काकडे (व्यवसाय) आदींचा समावेश आहे. प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णासाहेब काकडे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. या वेळी प्राध्यापक भालेराव यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतकऱ्यांविषयी असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच काव्यगायन सादर केले. माजी आमदार भांबळे, आडळ कर, कुलकर्णी, काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. व्हिजन इंग्लिश स्कूलचे संचालक संतोष कुलकर्णी, श्री शंकरलिंग देवस्थान अध्यक्ष अशोक वाडकर, उद्योजक गोपाळ काबरा, दत्तराव पावडे, प्रल्हाद कान्हेकर, कर्करोग तज्ज्ञ डॉ. वरूण नागोरी, मंगल कथले, निर्मला लिपणे, मधुकर पौळ यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी रघुनाथ बागल, शिवाजी गजमल, वसंतराव काकडे, रमेश डख, बापूराव काकडे, प्रसाद काकडे, मंजुषा बोराडे, सरपंच विजय काकडे, राजकिशोर जैस्वाल, विश्वनाथ काष्टटे, किशोर कटारे, श्रीपाद कुलकर्णी, राधाकिशन महाराज, सिद्धेश्वर शिंदे यांच्यासह काकडे सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!