आपला जिल्हा

शिक्षकांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील वेतनासाठी जिल्हाधिकारी अनुकूल

मराठवाडा शिक्षक संघाची आग्रही मागणी..

परभणी ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे यासाठी सोमवार ( दि. २१ ) ऑगस्ट रोजी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक यांना मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, विक्रम कदम, अशोक सूर्यवंशी, बी. टी. सांगळे, जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद,एन.टी.कदम,निशांत हाके,डी.के.देवकते यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले*. तर वेतन अधीक्षक मनोज भातलवंडे यांनी दोन दिवसात यासाठीची कार्यवाही पूर्ण होईल असा शब्द दिला.

शिक्षकांची हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीची कटिबध्दता व्यक्त करुन *मराठवाडा शिक्षक संघाचे विभागिय अध्यक्ष सुर्यकांतराव विश्वासराव यांनी मागच्या महिण्यात निधन झालेल्या शिक्षकांना कुठलेही विमा कवच मिळाले नाही याला जबाबदार कोण* असा संतप्त सवाल केला. *परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी शिक्षकांच्या संविधानिक अधिकारांचे हनन जाणिवपुर्वक केल्या जात आहे असा आरोप केला*. माजी नगर सेवक *सचिन देशमुख यांनी औषधी भवन येथे झालेल्या बैठकीत बोलतांना राजकिय दबावातुन शिक्षकांच्या मुलभुत हक्कांवर गदा येत असल्यामुळे माणुसकीच्या जाणिवेतुन शिक्षकांच्या आंदोलनाला बळ देण्याची* भुमिका विषद केली.
या वेळी मुख्यमंत्री महोदयांच्या नियोजित परभणी दौरा वेळी मुक मोर्चा द्वारे निवेदण देण्याचे ठरविण्यात आले
निवेदनावर सुर्यकांत विश्वासराव,विक्रम कदम, आर.एन.सुर्यवंशी,बी.टी.सांगळे,
जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, एन.टी.कदम,,निशांत हाके,डी.के.देवकते,प्रशांत बारुळकर,भारत कांदे,सुरेश हिवाळे,संतोष साखरे,कोमलवार एस.एस.एस.एस.,सुभाष ढगे,एम.जी.शेवाळे, संतोष क्षिरसागर, विशाल क्षिरसागर, शशांक पांडे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड,पी.एस.जाधव,पी.के.सवंडकर,घालगीर एम.व्ही.,गवंडगावे आर आर.,ए.ए..सुरासे,मासोळे एम.जी.,युव्ही.पौळ,एस.ई.लेंडे,ए.डी.पल्लेवार,डी.आय.शेख,पी.ए.चव्हाण,सौ.ऊषा परगे,सौ.यु.बी. शिंदे,श्रीमती अनिता मनोहरे,सौ.एम.पी.होंडराव,बोधले सर,जे.व्हि.निर्वाळ,आर.टी.झाडे,बी.एम..गायकवाड ,एस.व्ही.सावळे,ए.बी.खेबाळे,एन.सि.माने,ए.जी. गरुड,प्रताप काळबांडे पांडे एस.एस. डी.एस.देशमुख,एम.एस. रोकडे, व्हि.जी.शिंदे,एन.व्ही.अंभुरे,एस.डी.झोडपे,पी.एन. भोसले,एस.ए.नागरगोजे,पी.बी.चित्रे,शिवाजी गुट्टे,यांच्या सह सर्व तालुका कार्यकारणी व शिक्षकांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!