सेलू ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने वंदे मातरम् गीताची सार्धशताब्दी व दलितमित्र श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती निमित्त नूतन कन्या प्रशालेच्या कै. कमलाबाई बाहेती सभागृहात शुक्रवार ( दि. १९ ) रोजी ‘ गे माय भू’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम नूतन विद्यालय, नूतन प्राथमिक शाळा, नूतन कन्या प्रशाला, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पुजा महाजन यांच्या संयोजनात सादर केला. नांदेड येथील सिध्दोधन कदम यांनी तबला वादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, गोविंदराव जोशी, माजी न्यायमूर्ती श्रीपाद दिग्रसकर, उत्तमराव दिशागत, स्मिता देऊळगावकर, हेमलता देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात ” ‘ वंदे मातरम् सुजलाम सुफलाम मलयजशितलाम शश्यशामला मातरम्’ , ‘ या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’, ‘ हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषीतांचे, आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ , ‘ तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा ‘, ‘ हिंद देश के निवासी सभीजन एक है’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’, ‘ताकद वतन की हमसे है, हिंमत वतन की हमसे है’ ‘ इंनसान के हम रखवाले’, ‘दिशा दिशातून घुमतो,वंदे मातरम्’ , गे माय भू तुझे मी’, ही देशभक्तीपर गीते आणि संस्था गौरव गीत, दलितमित्र श्रीराजी भांगडिया यांच्यावरील गीत सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पसायदान गायनाने संगीत मैफलीची सांगता झाली. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन अतुल पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सुभाष बिराजदार यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी,कार्यकारिणी सदस्य, माजी विद्यार्थी दत्ता जोशी, बापू काळे, घटक संस्थेतील पदाधिकारी, प्राध्यापक , शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापक निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापुरकर, किशोर ढोके आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.