आपला जिल्हा

सेलू तालुक्यातील चालक, मालकांचा उद्या मंगळवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा

सेलू ( प्रतिनिधी ) केंद्र सरकारच्या हिट अॅन्ड रन कायद्याच्या विरोधात सेलु तालुक्यातील चालक, मालक दिनांक ०२/०१/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता नुतन कॉलेज मैदान येथुन तहसील कार्यालय सेलू पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चा बाबत सेलु तालुक्यातील चालक, मालक संघटना सेलू च्या वतीने परवानगीची मागणी केली आहे. या निवेदनावर जगन्नाथ नागोराव पवार अध्यक्ष, विठ्ठलराव ज्ञानोबा झोल उपाध्यक्ष, डिंगाबर श्रीरंगराव ढोंबे, माणिकराव गंगाराम काळे, भास्कर नंदु लिंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!