आपला जिल्हा

शरद ठाकर यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील केमापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शरद संदीपान ठाकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , संभाजीनगरची विद्यावाचस्पती पदवी मिळाली आहे. शरद ठाकर यांनी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक पाठक यांच्या मार्गदर्शनात ‘शेतकऱ्याचे मनोबल वाढवणारी मराठवाड्यातील ग्रामीण कविता : एक अभ्यास १९९०-२०१५’ याविषयावर आपले संशोधन पूर्ण केले. विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल शरद ठाकर यांचे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा. विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, सुरेश हिवाळे,अरूण चव्हाळ, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, माणिक पुरी, माधव गव्हाणे,प्रा. नागेश कान्हेकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत, व्यंकट तोरणाळे, डॉ. राजाराम झोडगे, प्रा. हनुमान व्हरगुळे, विजय ढाकणे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!