आपला जिल्हा

वधु वरांनी दिली वऱ्हाडी मंडळीला मतदान प्रतिज्ञा ; अशीही मतदार जनजागृती

सेलू ( प्रतिनिधी ) आपल्या देशातील लोकशाही निवडणूक पर्वाच्या निमित्ताने बोहल्यावर चढण्यापूर्वी वधु पुजा व वर नरेश यांच्या विवाह सोहळ्यात मतदार जागृती निमित्ताने व लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी

थोर पुरुषांच्या प्रतिमेच्या पुजना ऐवजी मतदार जागृती निमित्ताने स्वाक्षरी करून लग्नाच्या बोहल्यावर चढून
निर्भयपणे मतदान करण्याची शपथ केमापूर (ता.सेलू)येथे लग्न सोहळ्यात रविवार ता.२० रोजी
वधु वरांनी उपस्थित वऱ्हाडी मंडळीला दिली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर यांच्यावतीने मतदार जागृती निमित्ताने वधुवरांसह उपस्थित वऱ्हाडी मंडळीकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचे संकल्प पत्र भरून घेण्यात आले. त्यासोबतच
मतदार जागृती निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली त्यासाठी केमापूरचे दगडोबा माघाडे,सिंगठाळाचे ज्ञानेश्वर इघारे,बोथचे दत्ता शिंदे,पिंपळगाव गोसावीचे राजेभाऊ थोरात,वाईचे विकास पद्मावत हे बीएलओ व अंगणवाडी कर्मचारी कल्पना पालवे,आशा कार्यकर्ती रेखा बुधवंत पोलिस पाटील संतोष आंधळे यांनी बीएलओ पर्यवेक्षक शरद ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृतीचे कार्य केले.

माझ्या लग्न सोहळ्यात अनोख्या पद्धतीने मतदार जागृती करण्यात आली.मला मतदार जागृतीदूत होता आले याचा आनंद आहे.

– नरेश आघाव

( नवरदेव व महाराष्ट्रपोलीस)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!