आपला जिल्हा

सेलूत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

सेलू ( प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) करतात. महिन्याच्या शेवटी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या रमजान ईदचे चंद्रदर्शन बुधवारी झाल्याने गुरुवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी सकाळी विशेष नमाजासाठी सेलू शहरातील ईदगाह मध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी सेलू पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकसहकार्‍यांसोबत मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा दिल्या.


तालुक्यात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुस्लिम-हिंदू बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान हा मुस्लिम बांधवाचा पवित्र आणि उपवासाचा महिना म्हणून पाळला जातो. रमजान ईदला ‘ईद- उल- फित्र’ म्हटले जाते. या महिन्यांत 30 दिवस रोजे पाळणारे मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी ईदगाह मध्ये सकाळी 8वाजता विशेष नमाज मौलाना तज्जुमल कास्मी यांनी पढणं केली .8.30वाजता मदीना मस्जिद मध्ये मौलाना खाजा यांनी नमाज पढणं केले समाजात बधू भाव आपुलकी समता वृधि गत करत शहरातील साईबाबा नागरी बँक चे अध्यक्ष श्री हेमंत आडळकर, विनोद बोराडे माजी नगर अद्यक्ष, पवन आडळकर माजी नगर अद्यक्ष , माजी जि प सदस्य श्री अशोक काकडे, नामदेव अप्पा डख रघुनाथ बागल, मनिष कदम, संभाजी पवार, विट्टल काळबांडे, बाळू जोगदंड, विनोद तरटे, बाळासाहेब रोडगे, योगेश कुलकर्णी, आनंद डोईफोडे, वैभव वैध, गोटू धापसे,अरुण ताठे, आदी नी नमाज पढणं नंतर आलेल्या मुस्लिम बांधवच सत्कार केला हा अत्यंत सौहार्द आणि खुशीचा दिवस मानला जातो. नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात. शिरकुरमा, गोड पदार्थ करून हिंदू-मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते.

हदगांव पावडे येथे ईद उत्साहात साजरी

सेलू – हदगाव पावडे येथे सामूहिक ईद साजरी करण्यात आली. सर्व मुस्लिम बांधव मिळून गावकऱ्यांना, महिला मंडळ, मुले यांना मस्जिद येथे बोलवून शिरकुर्मा देण्यात आला. सामूहिक ईद चे हे नववे वर्ष आहे. यातून हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळते. यासाठी दत्तराव पावडे, अनंत पावडे, बाबासाहेब पावडे, इब्राहिम पठाण, रुस्तुम पठाण, हकीम सय्यद, फिरोज पठाण, सलमान पठाण यांनी पुढाकार घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी व मुस्लिम बांधव यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!