महाराष्ट्र

परळीकरांनो हीच वेळ कोहिनूर हिरे सांभाळण्याची !

अफवांमुळे परळीची बाजारपेठ आणि सांस्कृतिक, सामाजिक कार्य ठप्प होऊ देऊ नका..!

परळी / ( प्रतिनिधी ) परळी शहर हे बारा ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र, रेल्वे जंक्शन, थर्मल पावर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, साखर कारखाना आणि नैसर्गिक बालाघाटचा डोंगर अशा विविध धार्मिक, औद्योगिक आणि नैसर्गिक घटकांनी नटलेली आहे. या ठिकाणी हजारो लोकांना रोजगार मिळत होता तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या नगरीत प्रभुवैद्यनाथाच्या चरणी मस्तक ठेवायला येत असत तसेच येथील बाजारपेठही राज्यात नावाजलेली होती 40 वर्षांपूर्वी परळी बाजारपेठेचे विविध धान्यांचे भाव संपूर्ण महाराष्ट्रात रेडिओ वरून प्रसारित केले जात होते. त्यामुळे परळी शहराची एक वेगळीच ओळख देशात निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही अभिमानाने परळीचे आहोत हे सांगायला अभिमान वाटत होता. परंतु अलीकडे मात्र आता आम्ही परळीचे नाहीत असे खाली मान घालून सांगावे लागते. कारण परळीचे म्हटलं की आम्हाला कोणी दारातही उभे टाकू देत नाही राहण्यासाठी रूम देणे तर खूपच लांब. राष्ट्रीयकृत बँकाही आम्हाला कर्ज देत नाहीयेत. अशा अवस्थेत परळी शहरातील सामान्य नागरिकांनी जगावे की मरावे अशी अवस्था निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अनेक मोठमोठे व्यापारी, सुज्ञ नागरीक हे शहर सोडून कधीच निघून गेले हो, आणि आता इथे उरले ते केवळ खाजगी सावकार, विविध अवैध धंदे चालवणारे माफिया. अशा प्रवृत्तीमुळे परळी शहराचे 40 वर्षांपूर्वी असलेले वैभव हे कधीच निघून गेले, हे आपल्यालाही कळाले नाही. तरी आम्ही असल्या भीतीदायक अवस्थेत आपल्या आया बहिणीं, मुला बाळांना घेऊन जगतोच. कारण आमच्याकडे एवढा पैसा नाही की आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन एखादा व्यवसाय उभा करू आणि व आपली उपजीविका भागवू. हे कशामुळे झालं आणि कोणी केलं हे सांगण्याची गरजच राहिली नाही. येथील प्रत्येक नागरिक ह्या गोष्टी जाणून आहे. परंतु त्याला बोलण्याची हिंमत करू शकत नाही तर येथील प्रसिद्ध माध्यमही लिहू शकत नाहीत आणि असे झाले तर उद्या त्याच्या मुलाबाळांचा आया बहिणींचा प्रश्न निर्माण झालाच म्हणून समजा, त्याचे जगणे मिसकिल झालेच म्हणून समजा आणि त्यामुळेच या परळी शहराला आणि येथील भयभीती झालेल्या सामान्य नागरिकांना आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पाठबळ देणारे काही हिरे आपल्या शहरात आजही कार्यरत आहेत या हिऱ्यांना सांभाळण्याची गरज परळी करायची आपल्या सर्वांची आहे. या हिऱ्यामुळेच आज सर्वसामान्य नागरिकांना छोटे मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी 5 हजार ते 50 हजार पर्यंतचे कर्ज स्वरूपातली आर्थिक मदत याच हिऱ्यांकडून होत आली आहे. आणि त्या आर्थिकतेच्या बळावरच आज परळी शहरातील सामान्य नागरिक आपली उपजीविका आणि दोन वेळेच्या पोटाची खळगी भरू शकतो. तर हे हीरे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून राजस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, जागृती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर आप्पा शेळके सर, लोकमान्य पतसंस्थेचे अध्यक्ष पी एस घाडगे सर, सावरकर पतसंस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील व इतरही या सर्वांनी आपापल्या संस्था जनसामान्यांच्या विश्वासाहत उतरवल्या आहेत या पतसंस्थांनी भाजी विक्रेता, भंगार विक्रेता पासून ते विविध क्षेत्रातील छोटे मोठे उद्योगांना त्यांच्या त्यांच्या परीने कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करत आल्यामुळेच आज सर्वसामान्य माणूस परळीच्या बाजारपेठेत छोटी मोठी व्यवसाय टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत तर दुसरीकडे पाहिले तर परळी शहरात खूप मोठ मोठे राष्ट्रीयकृत बँका आहेत. परंतु या बँका सर्व सामान्य नागरिकांना दारातही उभे टाकू देत नाहीत अशावेळी या पतसंस्थाच सर्वसामान्यांच्या आर्थिक नाड्या बनवून आजही ताठ मानेने उभे आहेत आणि त्यामुळेच आपल्या शहराची बाजारपेठ चालते. परंतु सर्व गोण्यागोविंदाने नांदत असतानाही या समाजात, शहरात काही विघ्न संतोषी लोक असतातच. अशाच लोकांनी आपली सावकारी की मोठ्या प्रमाणात पसरवली असून गोरगरिबांना लुटण्याचा धंदाच या लोकांनी सुरू केला आहे. आणि त्यामुळेच की काय सर्वसामान्यांना सहकार्य करणाऱ्या या पतसंस्थांना खोट्या अफवा पसरवून बदनाम करायचं आणि अशा संस्था संपवण्याचा कट या लोकांकडून रचला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच की काय आज परळी शहरातील सर्वांच्या विश्वासास पात्र असलेली संस्कृतीक, सामाजिक या क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे गोर गोरबांच्या मुली बाळांच्या लग्न, दवाखाना अशा संकटकाळी धावून जाणारे चंदुलाल बियाणे राजस्थानी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना अडचणीत आणून परळी शहरातला हा हिरा संपवण्याचा घाट घातला की काय अशी शंका निर्माण झाली आहे. या अफवांमुळे एकट्या चंदुलाल बियाणी यांची राजस्थानी पतसंस्था अडचणीत आली नसून गंगाधर आप्पा शेळके सर यांच्या जागृती पतसंस्था, लोकमान्य पतसंस्था सावरकर पतसंस्था आणि ज्ञानेश्वरी पतसंस्था या संस्थांकडेही नागरिक आता संशयाने पाहत आहेत. परंतु परळीकरांनी घाबरून जाण्याची काहीच कारण नाही ,कारण या सर्व संस्थांनी आपन ठेवलेल्या रकमा दुसरीकडे कुठेतरी गुंतवणूक केलेली असते आणि असे केल्याशिवाय ठेवीदारांना ठेवलेल्या पैशावर व्याज देता येत नाही, त्यामुळे हे पैसे कुठेतरी गुंतवणूक करावीच लागते परंतु अशा चुकीच्या अफवांमुळे सर्वजण एकदाच पैसा मागण्यासाठी गेले तर कुठलीही संस्था किंवा कुठलाही व्यक्ती असेल तर इतरत्र गुंतवलेला पैसा तात्काळ मोकळा करून देऊ शकत नाही. याची जाणीव प्रत्येकाने ठेवून आज आपल्या परिसरातील अशा संस्था आणि त्यांची हिरे सांभाळण्याची अत्यंत गरज आहे. आणि हे परळीकरांनी केले नाही तर उद्या खूप मोठ्या आर्थिक अडचणीला प्रत्येकालाच सामोरे जावे लागणार आहे. कारण काही गिधाड रुपीज सावकार या ठिकाणी तुमचे आमची घर जागा जमिनी कब्जा करायला बसलीच आहेत. त्यामुळे अशा गिधाडापासून वाचायचं असेल तर आपल्याला या संस्था आणि हे हिरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकावेच लागेल. या सर्व पतसंस्था भोवती सर्वसामान्य परळीकर यांचा पैसा गुंतलेला आहे. तर यापूर्वी पळून गेलेल्या किंवा पुढे चुकीचे अफवांमुळे बंद पडल्या तर आपण गुंतवलेला पैसा कदापिही परत मिळणार नाही. त्यामुळे हे सर्व पतसंस्था वाचवायच्या असेल आणि पुढील वाटचाल चांगली व्हावी अशी सर्वांची इच्छा असेल तर या संस्थांना भक्कम पाठिंबा देणं हे प्रत्येक परळीकरांचं कर्तव्य आहे. त्यामुळे आज ज्यांनी या पतसंस्थांमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या आहेत त्यांनी या ठेवी काढून घेण्यासाठी गोंधळ घालून मारहाण, शिवीगाळ केली तर आपले सर्वांचे नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या संस्था कशा टिकल्या पाहिजेत आणि आपला पैसा, बाजारपेठ कशी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी या सर्व पतसंस्था आणि या हिऱ्यांना सहकार्य करणे काळाची गरज आहे. त्यामुळे परळीकरांनो सर्वांना कळकळीची विनंती आहे.(मी ही या पतसंस्थेत गुंतवणूक केलेली आहे.) की या सहकार्यात प्रत्येकाने पुढे येऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी म्हणण्याची वेळ आता तुमच्या आमच्यावर आली आहे.

………..प्रकाश सूर्यकर…….
संपादक दैनिक दिव्य अग्नि, परळी वैजनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!