आपला जिल्हा

सेलू आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालया मध्य “हिंदी पंधरवाडयाचा”समापन समारोप

सेलू ( प्रतिनिधी ) येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने 14 ते 27 सप्टेंबर या काळात हिंदी पंधरवाडा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला 1) निबंध स्पर्धेत प्रथम,भास्कर हिप्परगे द्वितीय, शमशोदीन शेख तृतीय, भालचंद्र बरडे2)अनुवाद करणे या स्पर्धेत प्रथम, शुभम जोशी द्वितीय, भास्कर हिप्परगे तृतीय,भालचंद्र बरडे यांना मिळाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कोडगिरकर (शाखा प्रबंधक )तर प्रमुख अतिथी योगेश जायभाये व भास्कर हिप्परगे उपस्थितीत होते,या प्रसंगी शमशोदीन शेख, गोपाळ गाडगे, मन्मथ देवडे, भास्कर हिप्परगे, योगेश जायभाये, संतोष कोडगिरकर यांनी राजभाषा हिंदी विषय माहिती दिली आणि हिंदी ही राष्ट्रभाषा असुन राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी हिंदी भाषेची गरज आहे त्यांनी आपले विचार व्यक्त केले या पंधरवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेतील विजेत्यांना संतोष कोडगिरकर यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले, या वेळी योगेश जायभाये, अविनाश जोशी, शमशोदीन शेख, भास्कर हिप्परगे, गोपाळ गाडगे,शिवाजी अघाव, अजय पुंडलिक, प्रजापती जगताप,भालचंद्र बर्डे, शुभम जोशी,कृष्णा बोराडे,अमर पाटील, मन्मथ देवडे,राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवणे,अरुण साळवे,गजानन वाकळीकर, अमिर शेख,नितीन भिसे आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!