आपला जिल्हा

महाशिवरात्री निमित्त शंकरलिंग मंदिरात शिवभत्तांची अलोट गर्दी

विश्वस्त समिती च्या उत्कृष्ट नियोजनामुळे भक्तांचे दर्शन झाले सूरळीत

सेलू ( प्रतिनिधी ) येथील श्री शंकरलिंग मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त भगवान श्री शंकरलिंगाच्या दर्शनासाठी भल्या पहाटे पासुनच शिव भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये महिला भक्तांची संख्या लक्षणीय होती.


सकाळी माजी नगराध्यक्ष श्री विनोदराव बोराडे यांच्या हस्ते लघुरूद्राभिषेक करण्यात आला.या वेळी माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, ए.पी.आय.रासकटला,मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष अशोकअप्पा वाडकर, सचिव प्रा. मिलिंद झमकडे,सहसचिव शुभम महाजन,कोषाध्यक्ष बालासाहेब सरकाळे,विश्वनाथ हुगे,शुभम सोळंके,पवन मिटकरी,महादेव आगजाळ,हरिश्चंद्रअप्पा साडेगावकर,बबनअप्पा झमकडे,रामदास पाटील, जगन्नाथअप्पा चाकोते,आदिंची उपस्थिती होती.आज जागतिक महिला दिनानिमित्त शिवभक्त सौ.वंदना कैलास स्वामी व सौ. शिवलिला थळपती यांचा सत्कार करण्यात आला. शिवभक्त महिला मंडळाने दुपारी १ ते ३ या वेळेत लिंगाष्टक गायन केले.

तसेच महाशिवरात्र महोत्सवानिमित्त येथील उद्योजक तथा शिवभक्त श्री जयप्रकाशजी बिहाणी यांनी मंदिरातील गाभाऱ्यात फरशी नुतनीकरण करून दिले. तसेच विश्वस्त समितीच्या वतिने मंदिराची रंगरंगोटी करून वर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच शिवनाम सप्ताहात आठवडाभर शिवकिर्तन, प्रवचन, दैनिक शिवपाठ, शिवनाम जागर, दैनिक प्रसादीक भोजन प्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज हजारो शिवभक्तांनी शंकरलिंग भगवंताचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. उद्या ९ मार्च रोजी महाप्रसाद व पालखी मिरवणुक व समाजभूषण गौरव सोहळा इत्यादी धार्मिक कार्यक्रमाने शिवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!