परभणी ( प्रतिनिधी ) गेल्या दशकापासून परभणी शहरांमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा राहून आणि त्यांनी त्यात भाग घेतला परंतु सुरुवातीला छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर सात ते आठ वर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा राहिला त्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी महाराष्ट्राचे दैवत कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि धनंजय मुंडे मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत अनावरणाचा सोहळा पार पडला त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी कृती समितीने वारंवार प्रयत्न केले परंतु त्यांना अखेर यश आले आणि या राज्याचे राज्यमंत्री अतुलजी सावे साहेब यांनी पुतळ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याचाच एक भाग म्हणून नऊ तारखेला रविवारी अकरा वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण परभणी येथे रविवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, मा.ना. अतुलजी सावे, मा.ना.जयकुमारजी गोरे,पालकमंत्री मा.ना.मेघनादिदी बोर्डीकर यांची उपस्थितीत होणार आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने फुले प्रेमींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यासह प्रत्येक गाव वाड्यावर त्यावरून कमीत कमी 500 ते 700 सावित्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने मीनाताई राऊत यांनी अशी आव्हान केले की आपण या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगीचा ऐतिहासिक भाग म्हणून मी या कार्यक्रमाचे साक्षीदार या निमित्ताने प्रत्येक महिलांनी आणि भगिनींनी या कार्यक्रमात सावित्री होऊन यावे म्हणजे खऱ्या अर्थाने सावित्रीचा इतिहास जगासमोर येईल आणि येणारी पिढी सक्षम आणि शैक्षणिक विचाराने परिपूर्ण अशी पडेल खऱ्या अर्थाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांचा पुतळा परभणीत उभा राहणं म्हणजे परभणी शहराच्या सौंदर्यात भर पडणं हे निश्चितच होणार आहे या पुतळ्यासाठी जागा देण्याचे काम महापौर प्रताप भैया देशमुख तसेच माजी आमदार सुरेश रावजी वरपूडकर साहेब आणि पुतळा संयोजन समितीमध्ये असलेले असंख्य फुले प्रेमी यांनी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा वाटा उचलला आहे आणि आज परभणी जिल्ह्यातील तमाम फुले प्रेमींची इच्छा पूर्ण होण्यासाठी नऊ तारखेला या कार्यक्रमाला पण उपस्थित राहावे असे पुन्हा एकदा नव्याने आव्हान करू या कार्यक्रमास जास्तीत जास्त उपस्थित राहून सहकार्य करावे.