आपला जिल्हा

कोल्हापुर येथे डॉ अभिषेक खराडे पाटील यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

---कर्नाटक, महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, गोवा ,मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यामधील विविध क्षेत्रातील गुणवंतांना गौरवण्यात आले

सेलू ता ७ ( प्रतिनिधी ) :सेलू येथील दैनिक सेवाशक्ती टाइम्स मराठी चे प्रतिनिधी श्री डॉ अभिषेक रमेशराव खराडे पाटील यांना एम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिषेक रमेशराव खराडे यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे संयोजन कमिटी यांच्याकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले असून दिनांक 7 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. यशवंत यशा हून उत्तम कोणतीही गोष्ट नाही आणि आपले कौतुक करण्यासाठी याहून चांगली संधी नाही.

श्री डॉ अभिषेक रमेशराव खराडे पाटील राहणार सेलू आपण पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या लेखणीतून परखड लिखाण करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली.
तसेच लेखणीतून अनेकांना न्याय देण्याचं अतिशय चांगले काम केलंय खरोखरच कौतुकास्पद आहे आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याची दखल घेऊन एम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे गौरविण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्याचे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश, दिल्ली येथील विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!