आपला जिल्हा
नागरे, राऊत, साडेगावकर ‘राष्ट्रवादी’त दाखल जिंतूर विधानसभा मतदारसंघ : राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण

सेलू ,दि.18(प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय साडेगांवकर, संत भगवानबाबा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब घुगे, लिंबाजीराव पुंजारे, अविनाश काळे यांच्यासह जवळपास 17 आजी-माजी सदस्यांनी शनिवार 18 जानेवारी रोजी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला.




