आपला जिल्हा

डॉ झाकेर हुसेन प्राथमिक शाळा सेलूच्या वतीने आयोजित स्नेह संमेलन संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ झाकेर हुसेन प्राथमिक शाळा सेलू तर्फे आयोजित स्नेह संमेलन आज दिनांक 31 जानेवारी बुधवार रोजी डॉ झाकेर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांच्या मार्गदर्शनात मोठया उत्साहाने संपन्न झाला स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदिना मस्जिदचे पेश इमाम शेख रईस खास्मी साहब उर्फ खाजा मौलाना हे होते तर व्यासपीठावर प्रमूख पाहूणे म्हणून जमियत उलेमा परभणी जिल्हा अध्यक्ष मौलाना मोहंमद सादेक साहब नदवी, परभणी एज्युकेशन सोसायटीचे सचिव शमीम भाई, लाईख उर रहेमान, अब्दुल बारी, अब्दुल खय्युम, पठाण रशीद खान इंजिनियर,पत्रकार अबरार बेग, रफीक बेलदार, शेख कलीम बेलदार, सह आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र ग्रंथ खुरान पठणाने करण्यात आली पवित्र ग्रंथ खुराण मध्ये करण्यात आलेल्या उपदेशाची उर्दू भाषेत माहिती उबेद मोहम्मद झुबेर केले तर नात पाक सबा शेख आणि मोहम्मद बिलाल, यांनी आपल्या गोड वाणीत सादर करत उपस्थित सर्व मान्यवरांचे मने जिंकले शाळेतील इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीत, सोशल मीडियाचे नुकसान, स्कूल चले हम, हिंदुस्तान हमारा है, मंजिल से आगे बढकर, एकाहून एक गीते सादर केले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले स्नेह संमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शेख सलीम, शेख अहेमद,मोहम्मद लईख, शेख रिझवान, सय्यद समीर हाश्मी, शेख फहीम, मुस्तफा खान, मौलाना जुनेद, सय्यद हमीद भाई, सय्यद साबेर सह आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!