आपला जिल्हा
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यांनी अभ्यासावा –तहसीलदार दिनेश झांपले
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायकल रॅली

सेलू (प्रतिनिधी ) दि 16मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मुक्ती संग्रामाचा इतिहास हा रोमांचकारी असून विद्यार्थ्यांनी हा इतिहास सविस्तरपणे अभ्यासायला हवा.कारण या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले कार्य आणि दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.हा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले.येथील हुतात्मा स्मारकात आयोजित सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.




