आपला जिल्हा
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार विजयी करा – प्रकाश आंबेडकर

जिंतूर ( प्रतिनिधी ) जिंतूर सेलू विधानसभेची निवडणूक प्रचार रणधुमाळी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा जिल्हा परिषद मैदानावर पार पाडली असून त्यांनी ओबीसी, एससी, एसटी आरक्षण वाचवण्यासाठी, तसेच पैगंबर,महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्या करणाऱ्यावर कठोर कायदा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्या म्हणून आव्हान केले आहे.





