आपला जिल्हा
आमदार मेघना बोर्डीकर यांचा सेलूत जनता दरबार.

सेलू, प्रतिनिधी येथिल बसस्थानक परिसरात सोमवारी (ता.१८) रोजी सकाळी दहा वाजता आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी तालुक्यातील नागरिकांचे प्रलंबित असलेल्या विविध कामे सोडविण्यासाठी जनता दरबार भरविला होता.
सेलू येथील जनता दरबारात नागरिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले. त्यामध्ये महसूल विभागा अंतर्गत येणाऱ्या श्रावण बाळ योजनेच्या पगारी, शेत रस्त्याची कामे, राशनचे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी, राशन कार्ड महिला बचत गटाच्या बँका महिलांची राष्ट्रीयकृत बँकेकडून होत असलेली अडवणूीच्या तक्रारी जाणून घेतल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून समस्या सोडविण्याचे सूचना केल्या बद्दल, साठगाव पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभाग चाऱ्यांची कामे, वालूर येथील दर्ग्याला निधीची मागणी, शहरासह ग्रामीण भागातील शमशान भूमीचे प्रश्न मार्गी लावणे, शहरात नाली व रस्ते च मागण्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे मांडल्या. सेलूसह तालुक्यातील ४०० ते ५०० नागरिकांनी आपली कैफियत आमदार मेघना बोर्डीकर यांच्या जनता दरबारात यांच्याकडे मांडली. नागरिकांचे प्रलंबित असलेली सर्व कामे करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या व जनतेचे कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी डॉक्टर संजय रोडगे संजय लोया भाजपा तालुका अध्यक्ष एडवोकेट दत्तराव कदम पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे डॉक्टर ऋतुराज साळेगावकर जयसिंग शेळके विठ्ठल कोकर कपिल फुलारी गणेश सवणे सरपंच उपसरपंच तालुक्यातील भाजप पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
…