आपला जिल्हा

शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू ता. (14) नाशिक येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मराठवाडा भूषण पुरस्कार यावर्षीचे मानकरी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे हे ठरले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो असे आयोजकांनी सांगितले.
शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल जसे की, मराठवाड्यातील पहिली ज्ञानतीर्थ विद्यालय मराठी माध्यमाची डिजिटल शाळा सुरू करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल या इंग्रजी शाळेचा ठसा उमटविणे, सेलु तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना अपूर्वा पॉलिटेक्निक या महाविद्यालयाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाचे दालन उभे करणे, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाच्या माध्यमातून औषधनिर्माण शास्त्र पदवी आणि पदविकाचेही शिक्षण सुरू केले. कोविड काळामध्ये आपल्याच स्वतःच्या संस्थेमध्ये शरदचंद्रजी पवार कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना आरोग्य सेवा देऊन त्यांच्याबद्दल जपलेल्या माणुसकी अशा विविध कार्याची दखल घेऊन मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे यांना पुरस्कार बहाल केला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी, सर्व घटक संस्थेचे प्राचार्य, शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!