आपला जिल्हा

हरिभाऊ चारठाणकर संमेलनात स्थानिक कलावंताचे सादरीकरण….

सेलू दि.३१(प्रतिसाद)- येथील हरिभाऊ चारठाणकर संगीतसंमेलनाच्या प्रात:कालीन सत्रात स्थानिक कलावंताचे सादरीकरण झाले.प्रारंभी सत्राचे उद्घाटन माजी प्राचार्य शरद कुळकर्णी, गोविंदभाऊ जोशी,गायक कलावंत विश्वनाथ दाशरथे,सी.एम.देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

भीमपलासने आरंभ

मैफलीत सुरूवातीला पूजा तोडकर यांनी राग ‘भीमपलास’ सादर केला.’गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’हे नाट्यगीत सादर केले.त्यांना हार्मोनियम संगत सच्चिदानंद डाखोरे यांनी तर तबला संगत गंगाधर कान्हेकर यांनी केली.त्यानंतर अनघा पांडे यांनी ‘यमन’चे प्रस्तुतीकरण केले.’केंव्हा तरी पहाटे’भावगीताने त्यांनी गाणसेवा संपविली.शंतनू पाठक या युवा कलावंताने राग पटदिप सादर केला.’कवन सुख पावे’ ही झपतालातील बंदिश सादर केली.’मर्मबंधातील ठेवही’नाट्यगीताने त्याने आपली सेवा संपविली.

मुलतानी ने सांगता

मैफलीची सांगता यशवंतराव चारठाणकर यांच्या गायनाने झाली.त्यांनी राग मुलतानी रागात ‘गोकूल गांव का छोरा’ हा विलंबित एकतालात तर ‘झनक झनक मोरी पायल बाजे’हा तिनताल सादर केला.पंढरी निवासा सखा पांडूरंग हा अभंग व सर्वात्मका सर्वेश्वरा भैरवीने आपलीमैफल संपविली.त्यांना हार्मोनियम संगत शांतीभुषण देशपांडे तर तबला संगत गजानन धुमाळ यांनी केली.कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन भालचंद्र गांजापूरकर यांनी तर आभारप्रदर्शन अजित मंडलिक यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!