आपला जिल्हा

एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे २२ वे पुष्प संपन्न

माणसाला माणूस बनण्याचे तत्वज्ञान संत कबीर यांनी दिले - डॉ. गंगाधर गळगे

सेलू ( प्रतिनिधी ) संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून विषमता, अंधश्रद्धेवर प्रहार केला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे तत्वज्ञान दिले. असे प्रतिपादन डॉ. गंगाधर गळगे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी -मराठी ग्रंथालय आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे २२ वे पुष्प शनिवार ( दि. २८ ) रोजी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात संपन्न झाले. या उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गंगाधर गळगे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नाटककार भिष्म साहनी यांच्या ‘कबिरा खडा बजार में ‘ या नाटकृतीचे अंतरंग उलगडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा काला होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्षमा निलेश बिनायके यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. गंगाधर गळगे म्हणाले की, ‘ पद्मभूषण भिष्म साहनी यांनी लिहिलेले ‘ कबिरा खडा बाजार में ‘ हे तीन अंकी नाटक आहे. ते आजही संगीत नाटक, पथनाट्याच्या स्वरूपात कुठे ना कुठे सादर होते. समाजात प्रेम, समता, बंधुता कबीराने रूजविली. अन्यायाचा प्रतिकार करायला शिकविले. ‘ असेही ते म्हणाले.

क्षमा निलेश बिनायके यांनी आपल्या मनोगतात संत कबीर यांच्या विविध दोह्यांचा दाखला दिला. कबीरांनी जीवनातील ताणतणाव, चिंता दूर करण्याचे सुत्र सांगितले. जीवन ही कला आहे. तेव्हा सर्वांना सोबत घेऊन आनंदाने जगले पाहिजे. हा मानवतावादी विचार संत कबीरांनी सांगितला. ‘ असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉ. सुरेश हिवाळे, कांचन हिवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक प्रा. रवी कदम यांनी केले. सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, सविता पल्लेवाड, रुपाली काला, लिना काला, शोभा बिनायके, किर्ती बिनायके,आरती बिनायके, कोमल काला, सपना काला, डॉ. शरद ठाकर, बाळू बुधवंत, सुभाष मोहकरे, रघुनाथ देशमुख, शिवाजी बोचरे, आनंद बाहेती यांची उपस्थिती होती.

येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमाचे २२ वे पुष्प गुंफताना डॉ. गंगाधर गळगे. व्यासपीठावर पुष्पा काला, क्षमा निलेश बिनायके, डॉ. काशिनाथ पल्लेवाड.

पुर्ण…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!