आपला जिल्हा

“चित्रकला स्पर्धांमधून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण व्हावी” – डाॕ. विवेक नावंदर

स्व.डाॕ पांडुरंगजी नावंदर स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा संपन्न

परभणी : ( प्रतिनिधी ) ” मानवी कलांचा अविष्कार म्हणजे चित्रकला होय. मुलांमध्ये लहानपणापासून कलेची आवड असते. या कलेचा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होते. त्या संधीमुळे विद्यार्थी आपल्या कलेचा अविष्कार प्रकट करतात. त्यामुळे त्यांना जागतिक पातळीवर ओळख निर्माण होण्याची संधी मिळते. म्हणून अशा चित्रकला स्पर्धांमधून जागतिक दर्जाची कला निर्माण करून जगाला आपली ओळख करून द्यावी.” असे प्रतिपादन डाॕ. विवेक नावंदर यांनी केले.


बाल विद्याविहार प्रशाला , अंबिका नगर परभणी येथे बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा प्रेरणास्थान स्व.डाॕ.पांडुरंगजी नावंदर यांच्या स्मरणार्थ भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्दघाटन संस्थेचे सचिव डाॕ. विवेक नावंदर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डाॕ. नंदकुमार झरकर हे होते.तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सदस्य श्री पवनकुमार झांजरी , सौ. डाॕ. अनिता नावंदर , परीक्षक कलाध्यापक तथा रांगोळी कलावंत श्री माधव घयाळ , चित्रकार तथा कलाध्यापक शेख जाहेद उमर ,बाल विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, स्पर्धेचे संयोजक तथा बाल विद्यामंदिर हायस्कूलचे कलाध्यापक केशव लगड,परभणी जिल्हा संघाच्या उपसचिव पंचशीला लहाने विविध शाळेचे कला शिक्षक उपस्थित होते.


अध्यक्षीय समारोप करताना डाॕ. नंदकुमार झरकर म्हणाले की, ” कला ही मानवाला आनंद देते. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी एक तरी कला जोपासली पाहिजे. असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.”
या स्पर्धेसाठी शहरातील 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विद्या विहार प्रशालेचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन विजयश्री वाघमारे यांनी केले. तर कलाध्यापक निर्मला सोडेगावकर यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!