आपला जिल्हा

*मराठवाडा हायस्कूल,सेमी-हिन्दी विभाग पालक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

परभणी ( प्रतिनिधी ) आज दि.27 सप्टेंबर 2025 रोजी नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर परभणी सेमी-हिन्दी विभागात वर्ग 5 वी ते 10 वी च्या वर्गासाठी, पालक सभेचे आयोजन करण्यात आले..
पालक सभेसाठी अध्यक्ष, संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापक आदरणीय श्री अनंतजी पांडे सर होते. व्यासपीठावर हिंदी-सेमी विभागाचे जेष्ठ पर्यवेक्षक श्री शिवाजीराव आरळकर सर, सहाय्यक पर्यवेक्षक श्री साळवे सर, पालक प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त शिक्षक श्री मल्हारीकांत देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आरळकर सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये सातत्याने सुसंवाद होणे काळाची गरज आहे. यासाठी पालक सभेचे आयोजन केले आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्री मल्हारीकांत देशमुख यांनी पालक सभेच्या आयोजनाचे कौतुक केले. तसेच हिंदी सेमी विभागातील शिक्षक सातत्याने पालकांच्या संपर्कात राहतात ही आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली .
पालक सभेला मार्गदर्शन करताना आदरणीय श्री. अनंतजी पांडे सर यांनी सर्वप्रथम एवढ्या पावसाच्या वातावरणातही प्रचंड संख्येने पालक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पालकांचे कौतुक केले. शाळेच्या व मुलांच्या, भवितव्याच्या दृष्टीने असे जागरूक पालक हा आशेचा किरण आहे,असे प्रतिपादन केले. कोणत्याही संपत्तीपेक्षा आपली मुले हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती असल्याचे सांगून विद्यार्थी राष्ट्राची भवितव्य आहेत. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी सतत आम्हाला मार्गदर्शन करावे असे आव्हान त्यांनी पालकांना केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा राबवत असलेले उपक्रम, विविध स्पर्धा,व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, समुपदेशन कार्यक्रम,याची पालकांना जाण करून दिली. पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी शाळेला नेहमी भेट द्यावी, अशी विनंती केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. . तसेच पालकांनी दिलेल्या सूचनांची आपण अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेबरोबर पालकांचाही सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे. कुटुंबातील आई वडीलांच्या अनुभवातून मुले संस्कार घरी शिकतात . पालकांनी मुलांसमोर मोबाईलचा वापर कमी करावा. मुलांची संगत, मुलांचा शालेय गृहपाठ, याबद्दल सतत पालकांनी सुद्धा जागरूक असले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले .

यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल शाळा विविध उपक्रम करत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. शाळेची शिस्त शाळेतील गृहपाठ, परीक्षा ,पालक सभा घेण्यासंदर्भात मराठवाडा हायस्कूलचे उपस्थित पालकांनी अभिनंदन केले.
सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय नागरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री सागर सुडके सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. याप्रसंगी हिंदी सेमी विभागातील ज्येष्ठ शिक्षक श्री जंगम सर, श्री सुडके ,श्री कटारे, श्रीमती गायकवाड ,श्री भारती,श्री देशपांडे ,श्री खिल्लारे, श्रीमती घोडे व श्री सूर्यकांत मामा यांनी पालक सभेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!