आपला जिल्हा
डी. डी. सोन्नेकर’ नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक! – प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर
नूतन विद्यालयात सेवानिवृत्तीचा भावविवश सहृदय सोहळा संपन्न

सेलू (प्रतिनिधी): सेवाभावातून कोणतीही संस्था मोठी होत असते. संस्थेचे कर्मचारी हीच संस्थेची ओळख अन् बलस्थाने असतात. श्री. डी. डी. सोन्नेकर यांनी सुरुवातीपासून प्रामाणिक ज्ञानार्जन व विद्यार्थी घडविण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. त्यामुळेच विविध खेळात अनेक विद्यार्थी तयार करून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय खुल्या मैदानी स्पर्धेत सेलू गावाचे तसेच नूतन शाळेचे नाव नेहमी अग्रस्थानी राहिले. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांना अनेक क्रीडा पुरस्कार देखील मिळाले आहेत. असे शिक्षक श्री. ‘डी. डी. सोन्नेकर’ नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक, कायम सर्वांच्या स्मरणात राहतील असे प्रतिपादन प्राचार्य डॉ विनायक कोठेकर यांनी केले.




