आपला जिल्हा

बाल राज्यनाट्य स्पर्धेत ‘ जड झाले ओझेचे ‘ उत्कृष्ट सादरीकरण

परभणी  ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने 20 व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेत नांदेड येथील कुसुम सभागृहात नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी (नृ.) चे जड झाले ओझे हे बालनाट्य सादर झाले.
विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणार दप्तराचं ओझं, पालकांच्या अपेक्षांचं ओझं. विद्यार्थ्यांनी आपलं करिअर निवडावं आणि त्या दृष्टीने धावत सुटावं यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हरवत चालले आहे. विद्यार्थ्यांच्या आत मध्ये असणारे गुण, छंद,कला, आवड यांना मात्र आजच्या या काळात कुठेच थारा दिसत नाही या सगळ्या अपेक्षांचे ओझं जड झाल असून ते हलकं होण्याची आवश्यकता आहे असा संदेश देणारे हे बालनाट्य सादर झाले.


नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी (नृ.) च्या बालनाट्याचे निर्मिती प्रमुख प्राचार्य पी.बी. शेळके हे होते.लेखन व दिग्दर्शन त्र्यंबक वडसकर यांचे होते. या बालनाट्यात बालकलावंत नम्रता नागेश वाघ, अंजली बालासाहेब वाघ, पंकजा विष्णू वाघ,संस्कृती संतोष पुजारी, कोमल रामकिशन बोनेवाड,जान्हवी मिथून चव्हाण, रूपाली विठ्ठल जोरवर, कोमल साहेब भूमरे, श्रध्दा दत्तराव वाघमारे, अक्षरा दशरथ एलकेवाड, रूपाली मुंजाजी जोरवर, वैभवी रामचंद्र वाघ, राधिका बालासाहेब वाघ यांच्या भूमिका होत्या तर नेपत्थ्य शैलेष ढगे, प्रकाश योजना विरेन दामूके, प्रा. संजय गजमल,संगीत लक्ष्मीकांत जोगेवार, वेदिका मुळे, रंगभुषा, वेशभुषा सौ. निर्मला वडसकर, शुभांगी पांचाळ तर रंगमंच व्यवस्था एन.एन.पवार, एस.बी.बुजुर्गे, राजू दिपके, डॉ. राम खरबे, एस.डी. गवई, प्रा. वसंत लोखंडे, गणेश धोपटे, गोपाळ मोरे, शंकर मुंढे, रामप्रसाद अवचार, माणिक कदम, राजेभाऊ मोरे, बळीराम बानायत, नारायण एलकेवाड, ज्ञानोबा दुधाटे,वैजनाथ गिराम, एन.जी. दुडके, कुलदीपक उंडाळकर यांची होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!